Thursday, 23 August 2012

Heart touching


गेल्याच आठवड्यात खरेदी केलेली नवी कोरी गाडी धुवून पुसून लख्ख करण्यात मग्न असलेल्या बापाचे आपल्या चार-पाच वर्षाच्या मुलाकडे लक्ष गेले. मुलगा दुसऱ्या बाजुला गाडीवर दगडाने रेघोट्या मारण्यात गुंतला होता. राग अनावर झालेल्या बापाने त्याचा हात खेचून दगड काढून घेतला आणि बोटे जोरातच दाबली. इवल्या जीवाला ते सहन झाले नाही. ते मुल कळवळले. त्याच्या रडण्याने भानावर आलेल्या बापाला वास्तवाची जाणिव झाली. ताबडतोब त्याने मुलाला दवाखान्यात दाखल केले. कोवळ्या बोटातील हाडात मल्टीपल फ्रॅक्चर झाले होते.
दुखऱ्या नजरेने त्याने बापाला विचारले "डॅ..डी, बोते कदी बरी होनाल?"
हवालदिल झालेल्या बापाच्या डोळ्यात अश्रू तरले. तो संदिग्ध मनाने दवाखान्या बाहेर आला. समोरच त्याची कार उभी होती. रागाने तो गाडीकडे आला आणि गाडीला जोर जोरात लाथा घालू लागला. शेवटी थकून आत पुढच्या सिटवर बसला. त्याला त्या रेघोट्या दृष्टीस पडल्या. न राहुन त्याने बाहेर येउन पाहीले. तर तिथे मुलाने लिहिले होते I Love you Dady!!!!!

No comments:

Post a Comment